सततची डोकेदुखी व त्यावरील उपाय....
नमस्कार, 🙏 आज आपण जाणून घेणार आहोत डोकेदुखी वरील कारणे व त्यावरील उपाय..... आज-काल सर्दी, खोकला, पित्त, अपचन यामुळे डोकेदुखीचा खूप त्रास होतो. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कामाचा असलेला ताण - तणाव, टेन्शन, शारीरिक थकवा , किंवा आजच्या डिजिटल युगामध्ये सतत विविध स्वरूपाच्या उपकरणांमुळे जसे की कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल व इतर उपकरणे यांचा सततचा वापर यामुळे डोके दुखीचा त्रास वाढतच चालला आहे. डोकेदुखी कॉमन झाली आहे. हा त्रास पुढे जाऊन मायग्रेन सारख्या आजारांमध्ये रूपांतरित होऊ शकतो. त्यावर उपाय करणे खूप गरजेचे बनले आहे. यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेळेचे नियोजन व डिजिटल उपकरणे किती वेळासाठी वापरावी याचे योग्य नियोजन केले पाहिजे. तसेच डिप्रेशन पासून दूर कसे राहता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यावर करता येण्यासारखे काही उपाय पुढीलप्रमाणे - नेहमी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे..... तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर स्वतःला आवडणारी गाणी आपण ऐकली पाहिजेत. त्यामुळे मन मोकळे होते व काही काळा करीता आपण ताणतणावापासून मुक्त होतो. आपल...