पोस्ट्स

टॉन्सिल्स आणि घशाच्या संसर्गावर घरगुती उपाय

इमेज
 टॉन्सिल्स आणि घशाच्या संसर्गावर घरगुती उपाय – कोमट पाणी आणि हळदीच्या गुळण्यांचे फायदे... बदलते हवामान, थंड पदार्थांचे सेवन, सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शन यांमुळे अनेकांना घशात खवखव, वेदना, गिळताना त्रास आणि टॉन्सिल्सची सूज अशा समस्या जाणवतात. घशाचा त्रास सुरू झाल्यानंतर योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. काही साधे घरगुती उपाय घशातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकतात. त्यापैकी कोमट पाणी पिणे आणि हळदीच्या गुळण्या करणे हे पारंपरिक उपाय आहेत. 1. कोमट पाणी पिण्याचे फायदे.. कोमट पाणी... घशात खवखव किंवा कोरडेपणा जाणवत असल्यास कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे घशाला आराम मिळतो आणि शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यास मदत होते. कसे वापरावे? - दिवसातून वेळोवेळी कोमट पाणी प्या. - खूप गरम पाणी पिणे टाळा. - घशात कोरडेपणा जाणवल्यास थोडे थोडे पाणी प्या. 2. हळदीच्या गुळण्यांचे महत्त्व... हळद... हळदीमध्ये कर्क्युमिन (Curcumin) नावाचे नैसर्गिक घटक असतात. त्यामध्ये दाह कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. मात्र, हळदीच्या गुळण्यांमुळे टॉन्सिल्सचा संसर्ग बरा होतो, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. हळद...

सततची डोकेदुखी व त्यावरील उपाय....

इमेज
 नमस्कार, 🙏 आज आपण जाणून घेणार आहोत डोकेदुखी वरील कारणे व त्यावरील उपाय..... आज-काल सर्दी, खोकला, पित्त, अपचन यामुळे डोकेदुखीचा खूप त्रास होतो. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कामाचा असलेला ताण - तणाव, टेन्शन, शारीरिक थकवा , किंवा आजच्या डिजिटल युगामध्ये सतत विविध स्वरूपाच्या उपकरणांमुळे जसे की कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल व इतर उपकरणे यांचा सततचा वापर यामुळे डोके दुखीचा त्रास वाढतच चालला आहे. डोकेदुखी कॉमन झाली आहे. हा त्रास पुढे जाऊन मायग्रेन सारख्या आजारांमध्ये रूपांतरित होऊ शकतो.           त्यावर उपाय करणे खूप गरजेचे बनले आहे. यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेळेचे नियोजन व डिजिटल उपकरणे किती वेळासाठी वापरावी याचे योग्य नियोजन केले पाहिजे. तसेच  डिप्रेशन पासून दूर कसे राहता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यावर करता येण्यासारखे काही उपाय पुढीलप्रमाणे -  नेहमी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे.....  तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर स्वतःला आवडणारी गाणी आपण ऐकली पाहिजेत. त्यामुळे मन मोकळे होते व काही काळा करीता आपण ताणतणावापासून मुक्त होतो. आपल...

आरोग्यदायी अंजीर

इमेज
 नमस्कार मित्रांनो / मैत्रिणींनो , आज आपण आपल्याला अंजीर खाण्याचे फायदे तसेच तोटे या बाबतीत माहिती देणार आहोत. अंजीर मध्ये असलेल्या औषधी गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे आपल्याला ड्रायफूट स्वरूपातही पहावयास मिळते. आपण हे सहा महिने ते एक वर्ष स्टोअर करून ठेवू शकतो. त्याचे योग्य वेळी व योग्य पद्धतीने सेवन केल्यास वेगवेगळ्या आजारांपासून ते आपलं संरक्षण करण्यात कार्यक्षम आहे.  आपण जर शारीरिक दृष्ट्या कमजोर असाल तर अंजीर आपल्याला मजबूत व बलवान बनवण्यासाठी खूप मदत करेल त्यामध्ये असलेले मिनरल्स, विटामिन्स यासारखे पोषक तत्व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करतात. अंजीर हे शक्तिवर्धक आहे. अंजीर खाण्याचे फायदे -  ▪️ आपल्याला जर सारखा आळस येत असेल, उदासीन वाटत असेल, कमजोरी जाणवत असेल तर नक्कीच आपल्याला अंजीर चे सेवन केलं पाहिजे. ▪ त्यामध्ये असलेले आयरन, सल्फर, विटामिन्स आपली एनर्जी टिकून ठेवतात. ▪️ याचे रोज योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते रक्ताचे प्रमाण वाढते. ▪️ आपल्याला जर कब्ज ॲसिडिटीचा त्रास असेल तर त्यावर अंजीर हे खूप ...

रात्री लसूण खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

इमेज
 नमस्कार मित्रांनो / मैत्रिणींनो, आज आपण लसणाचे  चे आयुर्वेदिक गुणधर्म पाहणार आहोत. साधारणपणे आपण पाहतो लसणाचा उपयोग सर्वत्र केला जातो. जेवणामध्ये असो किंवा घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये लसणाचे भरपूर फायदे आहेत. पण त्याबद्दल आपणास विशेष माहिती माहीत नसल्याने आपण त्याचा योग्य प्रकारे लाभ घेऊ शकत नाही. सर्वसाधारणपणे लसणाचा वापर जेवणामध्ये त्याची चव वाढवण्यासाठी फोडणीमध्ये केला जातो. पण इतरही त्याचे फायदे मी आज आपणास सांगणार आहे. त्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे आपणास आरोग्यास भरपूर फायदे मिळतात. रोज आपण त्याचा उपयोग करून कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण करू शकतो. त्यामुळे आपल्याला आहाराबरोबरच इतर वेळा ही त्याचा वापर केला पाहिजे. लसणामध्ये आरोग्याशी संबंधित भरपूर पोषक तत्व असतात जसे पोट्याशियम , तांबे , जस्त व इतर घटक की त्याचे औषधी गुणधर्म वाढतात. लसूण खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे - केस पांढरे होण्याची समस्या जर आपल्याला सतावत असेल तर रात्री एक लसुन अवश्य खायला हवा. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास लसुन हा खूप फायदेशीर आहे. रुग्णांना डॉक्टर एक लसणाची पाकळी दररोज खायचा...