सततची डोकेदुखी व त्यावरील उपाय....



 नमस्कार, 🙏

आज आपण जाणून घेणार आहोत डोकेदुखी वरील कारणे व त्यावरील उपाय.....

आज-काल सर्दी, खोकला, पित्त, अपचन यामुळे डोकेदुखीचा खूप त्रास होतो. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कामाचा असलेला ताण - तणाव, टेन्शन, शारीरिक थकवा, किंवा आजच्या डिजिटल युगामध्ये सतत विविध स्वरूपाच्या उपकरणांमुळे जसे की कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल व इतर उपकरणे यांचा सततचा वापर यामुळे डोके दुखीचा त्रास वाढतच चालला आहे. डोकेदुखी कॉमन झाली आहे. हा त्रास पुढे जाऊन मायग्रेन सारख्या आजारांमध्ये रूपांतरित होऊ शकतो.

          त्यावर उपाय करणे खूप गरजेचे बनले आहे. यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेळेचे नियोजन व डिजिटल उपकरणे किती वेळासाठी वापरावी याचे योग्य नियोजन केले पाहिजे. तसेच  डिप्रेशन पासून दूर कसे राहता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

त्यावर करता येण्यासारखे काही उपाय पुढीलप्रमाणे - 

नेहमी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे.....

 तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर स्वतःला आवडणारी गाणी आपण ऐकली पाहिजेत. त्यामुळे मन मोकळे होते व काही काळा करीता आपण ताणतणावापासून मुक्त होतो.

आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे अशा गोष्टी सतत केल्या पाहिजेत जसे की काही स्किल्स जोपासले पाहिजेत गायन, वादन, क्रीडा, व्यायाम, योगा करणे या गोष्टींवर भर दिला पाहिजे.

तसेच वेळेवर झोपणे, पूर्ण झोप घेणे....

रात्रीचे जागरण टाळणे

वेळच्या वेळी जेवण घेणे जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित होईल व पित्त अपचन यासारखे त्रास होणार नाहीत याचा डायरेक्ट परिणाम डोकेदुखी वर होतो.

ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी बर्फाच्या गोळ्याने शेक द्यावा. मायग्रेन बरा होऊ शकतो.

रात्री झोपताना खोबरर्याच्या तेलाने पाच मिनिटे डोक्याची हळुवार मालिश करावी.

दीर्घ श्‍वसन करावे त्यामुळे मनाला शांती मिळेल व डोकेदुखी वर आराम मिळेल.

आपण जर चहा पीत असाल तर चहा बंद करावा चहा पिणमुळे 120 प्रकारचे आजार होतात.  याबदल्यात ग्रीन टी किंवा लेमन टी प्यावी.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्व रोगांवर फायदेशीर ANTOX T

आरोग्यदायी अंजीर