आरोग्यदायी अंजीर



 नमस्कार मित्रांनो / मैत्रिणींनो,

आज आपण आपल्याला अंजीर खाण्याचे फायदे तसेच तोटे या बाबतीत माहिती देणार आहोत. अंजीर मध्ये असलेल्या औषधी गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे आपल्याला ड्रायफूट स्वरूपातही पहावयास मिळते. आपण हे सहा महिने ते एक वर्ष स्टोअर करून ठेवू शकतो. त्याचे योग्य वेळी व योग्य पद्धतीने सेवन केल्यास वेगवेगळ्या आजारांपासून ते आपलं संरक्षण करण्यात कार्यक्षम आहे. 

आपण जर शारीरिक दृष्ट्या कमजोर असाल तर अंजीर आपल्याला मजबूत व बलवान बनवण्यासाठी खूप मदत करेल त्यामध्ये असलेले मिनरल्स, विटामिन्स यासारखे पोषक तत्व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करतात. अंजीर हे शक्तिवर्धक आहे.



अंजीर खाण्याचे फायदे

▪️ आपल्याला जर सारखा आळस येत असेल, उदासीन वाटत असेल, कमजोरी जाणवत असेल तर नक्कीच आपल्याला अंजीर चे सेवन केलं पाहिजे.

▪ त्यामध्ये असलेले आयरन, सल्फर, विटामिन्स आपली एनर्जी टिकून ठेवतात.

▪️ याचे रोज योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते रक्ताचे प्रमाण वाढते.

▪️ आपल्याला जर कब्ज ॲसिडिटीचा त्रास असेल तर त्यावर अंजीर हे खूप परिणामकारक रित्या काम करतं. तसेच पोटाचे इतर त्रासदायक आजारांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला मदत करतं.

▪️ हाय बीपी चा कोणाला त्रास असेल तर त्यांनी अंजीर चे सेवन जरूर करावे. हाई बीपी कंट्रोल करण्यासाठी अंजीर चा वापर आपण नक्कीच करू शकता.

▪️ वजन कमी करण्यासाठी अंजीर चा वापर आपण करू शकता पाण्यात भिजवून खाल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. तसेच जर आपल्याला वजन वाढवायचे असेल रात्री दुधातून अंजीर चे सेवन करू शकता.

▪️ शुगर कंट्रोल करण्याची ही अंजीर ची क्षमता उत्तम आहे.

जसे अंजीर खाण्याचे काही फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत - 

अंजीर चा वापर योग्य प्रमाणातच केला पाहिजे.

त्याचा अतिवापर आपल्यासाठी हानीकारक देखील ठरू शकतो. जर अंजीर खाण्यात आपण योग्य प्रमाण ठेवले नाही तर ब्लड शुगर चे प्रमाण वाढू शकते. म्हणून याचे नियमित सेवन करावे पण योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे.

    याच्या सेवनाने काही व्यक्तींना ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे त्याचे सेवन त्यांनी करू नये.

 ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशर लो होण्याचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अंजीर खावे.

     धन्यवाद....

-----------------------------------------------------Translation....

Hello friends,


 Today we are going to tell you about the advantages and disadvantages of eating figs. The medicinal properties of figs are very beneficial for health. You can also see this in dryfoot format. We can store it for six months to a year. It is effective in protecting us from various diseases if it is consumed at the right time and in the right way.


Advantages to eating figs

 If you are physically weak then figs will help you a lot to make you strong and strong. Figs are a tonic


If you are feeling sluggish, depressed, weak then you should definitely consume figs.


 Contains Iron, Sulfur, Vitamins.


  Proper intake of it daily increases the level of hemoglobin in the blood.


 ▪️ If you suffer from constipation acidity then figs work very effectively on it.  It also helps you to get rid of other stomach ailments.


  If anyone has high BP, they should consume figs.  You can definitely use figs to control high BP.


  You can use figs for weight loss. Soaking in water is beneficial for weight loss.  Also, if you want to gain weight, you can consume figs from milk at night.


  This fig has great ability to control sugar.

Just as there are some advantages to eating figs, there are also some disadvantages -


 Figs should be used in moderation.


 Its overuse can also be harmful to you. If you don't eat the right amount of figs, your blood sugar can rise. So it should be taken regularly but in the right amount.


 Its consumption can cause allergies in some people. Therefore, they should not consume it.


 People who suffer from low blood pressure should eat figs on the advice of a doctor.


 Thank you.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सततची डोकेदुखी व त्यावरील उपाय....

सर्व रोगांवर फायदेशीर ANTOX T