रात्री लसूण खाण्याचे आश्चर्यकारक फायदे


 नमस्कार मित्रांनो / मैत्रिणींनो,

आज आपण लसणाचे चे आयुर्वेदिक गुणधर्म पाहणार आहोत. साधारणपणे आपण पाहतो लसणाचा उपयोग सर्वत्र केला जातो. जेवणामध्ये असो किंवा घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये लसणाचे भरपूर फायदे आहेत. पण त्याबद्दल आपणास विशेष माहिती माहीत नसल्याने आपण त्याचा योग्य प्रकारे लाभ घेऊ शकत नाही. सर्वसाधारणपणे लसणाचा वापर जेवणामध्ये त्याची चव वाढवण्यासाठी फोडणीमध्ये केला जातो. पण इतरही त्याचे फायदे मी आज आपणास सांगणार आहे. त्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे आपणास आरोग्यास भरपूर फायदे मिळतात. रोज आपण त्याचा उपयोग करून कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण करू शकतो. त्यामुळे आपल्याला आहाराबरोबरच इतर वेळा ही त्याचा वापर केला पाहिजे. लसणामध्ये आरोग्याशी संबंधित भरपूर पोषक तत्व असतात जसे पोट्याशियम, तांबे, जस्त व इतर घटक की त्याचे औषधी गुणधर्म वाढतात.

लसूण खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे - केस पांढरे होण्याची समस्या जर आपल्याला सतावत असेल तर रात्री एक लसुन अवश्य खायला हवा.

रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास लसुन हा खूप फायदेशीर आहे. रुग्णांना डॉक्टर एक लसणाची पाकळी दररोज खायचा सल्ला देतात. शरीरामध्ये साठलेले विषारी घटक सहज बाहेर काढण्याचे काम लसूण करतो. लसणाची नियमीत रात्री एक पाकळी खाल्ल्यास पोटाच्या पचन - अपचन संदर्भातल्या इतर सर्व समस्या दूर होतात. पुरुषांना लैंगिक दृष्ट्या मजबूत ठेवण्याचं काम लसुन उत्कृष्ट पद्धतीने करतो. शरीरामध्ये ताकत जोश निर्माण करण्याचे काम लसुन करतो. विविध आजारांपासून, इन्फेक्शन पासून आपला बचाव करण्याचे काम करतो. 

भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अजीर्ण, जंत, पोटातील वेदना अशा आजारांवर लसणाचे नियमित सेवन करणे फायदेशीर ठरते. 

लसणाच्या पाकळ्या 30 मि.ली दुधामध्ये चांगलं गरम करून दररोज हे दूध घेतल्याने दमा, क्षय रोग, जुनाट खोकला यांचा नाश होतो.

लसुन खाण्याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही असतात. - लसूण तीक्ष्ण - उष्ण असल्याने पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी त्याचा वापर थोडक्यात करावा गर्भवती स्त्रियांना तो वर्ज्य आहे. मद्यपान करणारे, पोटात आग होत असेल तर अशा व्यक्तीने लसूण खाऊ नये.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सततची डोकेदुखी व त्यावरील उपाय....

सर्व रोगांवर फायदेशीर ANTOX T

आरोग्यदायी अंजीर